कृषी विज्ञान केंद्र / Krishi Vigyan Kendra (KVK)

राज्यातील कृषि व संबंधित विभागातील अधिकार्यांना व कर्मच्यार्यांना नवनवीन कृषि उच्च तत्राज्ञानाबाबत चारही कृषि विध्यापिठामार्फत प्रशिक्षण दिले जाते. विध्यापिठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान प्रदर्शने, प्रात्याक्षिके , मेळावे, प्रकाशाने, शिवार फेरी व प्रशिक्षणाद्वारे राज्याच्या विस्तार यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाते. कृषि विद्यापीठांतर्गत केंद्रांमार्फत व खाजगी व्यवस्थापनाखाली प्रत्येक जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या केंद्रामार्फत हे कार्य केले जाते. तसेच कृषि प्रशिक्षणाचे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. राज्यातील कृषि विस्तार यंत्रणेला नवीन विकसित झालेल्या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षित करणे आणि यांच्यामार्फत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विध्यापिठातील संशोधकांपर्यंत पोहोचवून शेतकर्यांना आवश्यक असणारे संशोधन विद्यापीठात करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे कृषि विज्ञान केंद्रे